आदित्य मुलांचे वसतिगृह
विद्यार्थ्यांमध्ये आनंदी आरामदायी आणि अभ्यासाचे निरोगी वातावरण रहावे तसेच स्वयंशिस्त व अनुशासन असावे आणि त्यांना उत्तम सुविधा मिळाव्यात त्यातून त्यांच्या वैयक्तिक आयुष्याला आकार प्राप्त व्हावा या उद्देशाने ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांची कमीत कमी किमतींमध्ये राहण्याची उत्तोम सोया व्हावी म्हणून १०० विद्यार्थ्यांची क्षमता असणाऱ्या वस्तीगृहाची स्थापना करण्यात आली.प्रथम वर्षात प्रवेश घेणाऱ्या विध्यार्थ्यांना वस्तीगृहात राहण्यास प्रोत्साहित केले जाते.प्रत्येक विध्यार्थ्याला खाट,गादी तसेच प्रत्येकासाठी लगेज लॉकर ची सुविधा देण्यात आली आहे. वस्तीगृहामध्ये पिण्यासाठी एक्वागार्ड फिल्टर ची सुविधा आहे.अंघोळी साठी गरम पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.कपडे धुण्यासाठी स्वतंत्र जागेची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.विध्यार्थ्यांना कमी दरामध्ये मेस ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे एकूण वस्तीग्रहाचे वातावरण आनंदी आरामदायी व अभ्यासास अनुकूल आहे.
हे वसतिगृह पूर्णपणे सुरक्षित आहे.
दृष्टी
तांत्रिक शिक्षण आणि जागतिक स्तरावर उदयोन्मुख औद्योगिक आणि व्यवसायाच्या संधी लक्षात घेऊन वस्तुभिमुख शिक्षण घेता येईल याकरिता ग्रामीण भागातील विध्यार्थ्यांना सोयीस्कर आणि कमी खर्चामध्ये चांगली व्यवस्था देणे.
मिशन
“जगात कुठेही संसाधन व्यक्ती म्हणून काम करू शकणारा सक्षम आणि बौद्धिक नेता म्हणून मानवी क्षमता विकसित करणे”.
जवळची महाविद्यालये
सदगुरु गाडगे महाराज महाविद्यालय
यशवंतराव चव्हाण विज्ञान महाविद्यालय
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय